महाराष्ट्रात आणि मुंबईत ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरला पार्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान लागू असणार आहेत.
- मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवासावर बंदी.
- महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणीच वैध असणार आहे.
- कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहू शकतात.
- आयोजित कार्यक्रमातील, सेवेशी निगडीत असणारे आयोजक, सहभागी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक या सर्वांचेच पूर्णपणे लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.
- कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे.
- बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
- मोकळ्या जागी 25% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
- 31 डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणा-या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये महापालिकेची 4 पथकं तैनात असतील.
- नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.