महाराष्ट्र

Omicron : राज्यात आठ रूग्ण ‘ओमायक्रॉन’ बाधित; तर ८५४ नवीन कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आज दिवसभरात आणखी ८ रूग्ण 'ओमायक्रॉन' बाधित आढळले आहेत. तर, आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आहेत. तसेच ८५४ नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.मुंबईतील चारही रूग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रूग्ण मुंबईतील आहे. इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.

पूर्व आफ्रिकेचा प्रवास करून आलेले साताऱ्यातील एकाच कुटुंबातील तीन रूग्ण 'ओमायक्रॉन' बाधित आढळले आहेत. हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे. तर पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.

एकूण बाधित

मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३ , सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ अशी रूग्ण संख्या आहे. तर, यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

८५४ नवीन करोनाबाधित

राज्यात दिवसभरता ८५४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९६,७३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे.राज्यात आज ११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ८०,०३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ८८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा