(Battis Shirala ) जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाची पूजेसाठी प्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या निमित्ताने येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक येतात. न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश दिल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रतीकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते.
सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे.केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या परवानगीमुळे शिराळाकरांना आनंद झाला आहे. बत्तीस शिराळ्यात आता जिवंत नागाचे दर्शन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर 23 वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात प्रतिकात्मक नागांची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मात्र आता न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार यंदा शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन होणार आहे.
शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिराळाकरांकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आले असून नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचे दर्शन देखील होणार आहे.