MUNICIPAL ELECTIONS 2026: FOUR VOTES MANDATORY UNDER NEW MULTI-MEMBER WARD SYSTEM 
महाराष्ट्र

Voting Process Change: एक मतदार, चार मतदान! मतदारांना ४ वेळा मतदान का करावं लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Municipal Elections 2026: महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची पद्धत बदलली आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असल्याने मतदारांना चार वेळा मतदान करावे लागणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एकदाच बटन दाबून मतदान संपणार नाही!” असा अनुभव अनेक मतदारांना येणार आहे. कारण जानेवारी 2026 मधील या निवडणुकीत मतदानाची पद्धतच बदलली आहे. नेहमीसारखं ईव्हीएमसमोर उभं राहून एकदाच बटन दाबलं आणि मतदान झालं, असं यावेळी होणार नाही. चुकून एक मत कमी दिलं, तर तुमचं संपूर्ण मतदानच अमान्य ठरू शकतं. त्यामुळे मतदान केंद्रात जाण्याआधी हे नियम माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान करताना मत कसं नोंदवायचं आणि EVM वर किती वेळा बटन दाबायचं ही एक वेगळी पद्धत महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना अनुभवायला मिळेल.

बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे काय ?

बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे एका प्रभागातून एक नव्हे तर चार नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात चार उमेदवारांचे पॅनल असणार असून, मतदारांना या चारही उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीत एका वॉर्डमधून फक्त एक नगरसेवक निवडला जात होता. त्या वेळी एक मतदार, एक उमेदवार आणि एक मत अशी सोपी प्रक्रिया होती. मात्र नव्या पद्धतीत एका वॉर्डमधून चार नगरसेवक निवडले जाणार असल्याने, चारही मतं देणे बंधनकारक आहे.

मतदान करताना मतदारांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मतदार चार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मत किंवा एका पक्षाच्या चारही उमेदवारांना मत देऊ शकतात. यामध्ये कोणतीही अट किंवा बंधन नाही. जर तुम्हाला चारपैकी कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल, तर 'नोटा'चा पर्यायही उपलब्ध असेल. शेवटी, ड जागेसाठी मतदान केल्यानंतर ईव्हीएममधून एक बजर वाजेल. हा आवाज म्हणजे तुम्ही चारही जागांसाठी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, याची खात्री असणार आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशी गोंधळ न होता शांतपणे आणि पूर्ण माहिती घेऊन मतदान करणं प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे.

  • जानेवारी २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची नवी पद्धत लागू.

  • एका प्रभागातून चार नगरसेवक; मतदारांना चार स्वतंत्र मतदान बंधनकारक.

  • एक मत कमी दिल्यास संपूर्ण मतदान अमान्य ठरण्याची शक्यता.

  • चारही मतदान पूर्ण झाल्यावर ईव्हीएममधून बजर वाजणार, हीच यशस्वी मतदानाची खूण.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा