Road side warning triangle, warning oncoming traffic of a broken down car, 
महाराष्ट्र

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात, एक ठार तर तीन जखमी

Published by : Lokshahi News

संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली येथे उभ्या असलेल्या अज्ञात वाहानाला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच ठार झाला आहे तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. आज पहाटे हा आपघात झाला असून औरंगाबाद येथील ५६ वर्षीय अरूण अनंतराव जोशी या अपघातात ठार झाले आहेत.

अरूण जोशी व चौघे जण पुणे येथून संगमनेर मार्गे औरंगाबादला जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली येथे पहाटे आले असता त्याच दरम्यान त्यांनी समोर उभ्या असलेल्या अज्ञात वाहणाला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे झालेल्या अपघातात अरूण आनंतराव जोशी हे जागीच ठार झाले. तर इतर तिघे जण हे जखमी झाले आहेत या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घारगाव पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या