महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात 'ऑपरेशन लोटस' सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

'फार काळ विरोधी पक्षात राहायच नाही', असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी फडणवीसांनी फटकेबाजी केली. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. अनेकदा गैर राजकीय व्यक्तींचा यामध्ये सहभाग असल्याचे देखील वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत विधान केलं होतं. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये होणारी खलबतं महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण करू शकतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. भाजपाने त्याला अधिकृत दुजोरा दिला नसला तरीही, नेत्यांची वक्तव्य सत्तांतराच्या पारड्यात असल्याचं चित्र आहे.

मात्र, जोपर्यंत विरोधात आहोत तोपर्यंत ताकदीने भूमिका निभावणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

देशभरात ऑपरेशन लोटस?

कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये याआधी भाजपाला तत्कालीन राज्य सरकारं पाडण्यात यश आलं आहे. सत्ताधारी पक्षांतील आमदार फोडून सरकार अल्पमतात आणायचं आणि त्यानंतर स्वत:चा मुख्यमंत्री बनवायचा, अशा घटना याआधीही समोर आल्या आहेत. कर्नाटकात कुमारस्वामी यांचे सरकार पाडून बी.एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मध्यप्रदेशात कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतली. तसेच सिंधिया यांनाही हाताशी घेऊन भाजपाने काँग्रेसला भगदाड पाडलं. गोव्याच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत नसतानाही त्या ठिकाणी सत्ता आणण्यात भाजपा यशस्वी झाला. राजस्थानमध्ये काही काळ सरकार अल्पमतात आणण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांचेही सरकार धोक्यात आले होते. पण ते वाचले. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस अंतर्गत सत्ता आणण्याचे राजकारण भाजपा शिजवत असल्याची चर्चा आहे. राज्यातही सत्तास्थापनाची गडबग सुरू असताना 'पहाटेचा शपथविधी' झाला होता. हा इतिहास लक्षात घेता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देखील सत्ताबदलाचे संकेत फडणवीसांनी दिले आहेत.

'हा' तर सरकार पाडण्याचा डाव

भाजपा विरोधी पक्षात गेल्यापासूनच त्यांची ऑपरेशन लोटसची तयारी सुरू झाली आहे. यासाठी त्यांनी आधीपासूनच प्रयत्न सुरू केले असून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा हा डाव आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. सतत सत्तेत राहण्याची सवय झाल्याने भाजपाच्या गोटात आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कामच करू द्यायचं नाही, हा त्यांचा पवित्रा आहे, असे सावंत म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा