Mangesh Kudalkar 
महाराष्ट्र

Mangesh Kudalkar : सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण; मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mangesh Kudalkar) सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यवसायिक संकुल बांधणाऱ्या शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने धक्का दिला आहे.

आमदार कुडाळकर यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे एसीबीला आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.

आमदार कुडाळकर यांच्यावर मतदारसंघात विकासकामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप रमेश बोरवा यांनी केला आहे.

Summery

  • सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण

  • मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

  • कुडाळकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा