बालाजी सुरवसे, उस्मानाबाद | तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी वशिलेबाजी आणि सो कॉल्ड व्हीआयपींना लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे. मंदिराचे विश्वस्त तथा उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी आदेश जारी केले आहेत.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे.तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य व्यक्तीरीक्त अन्य कोणालाही मोफत अथला व्हिआयपी दर्शनास दिला जाणार नाही. महत्त्वाचे व्यक्ती त्यांची पत्नी किंवा पती,मुले,आई,वडील तसेच मंञी महोदय यांचे सोबतचे खाजगी सचिव,विशेय कार्य यांना समावेश राहील. माञ मंञ्यांसोबत असणारे इतर व्यक्तींना घाटशिळ पार्किंग येथुनच दर्शनाचा लाभ मिळणार आहे. मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे यांनी आदेश जारी केले आहेत.