महाराष्ट्र

पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर! सरकार आर्थिक संकटात

Sri lanka आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहिती आहे. आता अशीच अवस्था शेजारी देश Pakistan मध्येही होण्याची शक्यता आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या (Sri lanka) आर्थिक स्थिती संपूर्ण जगाला माहिती आहे. श्रीलंका देशात आणीबाणी (Emergency) जाहीर झाली, राष्ट्रपती देश सोडून पळून गेले. देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोकांना अन्न, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. आता अशीच अवस्था शेजारी देश पाकिस्तानमध्येही (Pakistan) होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची श्रीलंकेपेक्षा स्थिती वाईट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे पाकिस्तानवर परकीय कर्ज वाढत आहे. तर दुसरीकडे परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे रोखीच्या टंचाई निर्णाण होऊन पाकिस्तानला भविष्यात गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या जून महिन्याच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे. पाकिस्तानचा परकीय चलन साठा जूनमध्ये 226.2 डॉलर दशलक्ष होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये तिमाहीतच पाकिस्तानवरील कर्ज वाढून 10.886 अब्ज डॉलर झाले आहे. तर, 2021 साली हे कर्ज 13.38 अरब डॉलर होते. 2022 मध्ये हे कर्ज वाढून 4.875 अब्ज डॉलरने वाढले.

डॉनच्या अहवालानुसार, पाकिस्तानसमोर बाह्य आघाडींचे गंभीर आव्हान आहे. गेल्या महिन्यात चीनकडून 2.3 अब्ज डॉलरचे कर्ज मिळाले असूनही, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत लक्षणीय घट झाली आहे. तर, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक (World Bank) आणि आशियाई बँकेकडूनही (Asian Bank) योजनेसाठी निधी मिळत नाही.

एका वरिष्ठ विश्लेषकांच्या मते, पाकिस्तान कर्ज परत करु शकत नाही, हे चीनला माहित आहे. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला लवकर मदत करणार नाही. पाकिस्तान उधार घेऊन कर्ज फेडू शकतो. परंतु, यामुळे पाकिस्तानावर कर्जाचा भार वाढला आहे.

दरम्यान, पाकिस्तानसमोर सध्या वाढती महागाई, परकीय चलनाच्या गंगाजळीत घट, पाकिस्तानी रुपयांची आंतरराष्ट्रीय बाजारात घट यांसारख्या मुख्य समस्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा