महाराष्ट्र

Pandharpur By Poll | निडणुका भोवल्या… पंढरपुरात ३ हजार २२८ कोरोनाबाधितांची नोंद

Published by : Lokshahi News

कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार आणि मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मार्च महिन्यात पंढरपुरात 855 कोरोना बाधित सापडेल होते. आता एप्रिल महिन्यात तीच संख्या 3 हजार 228 वर पोहचलीय.

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधनानंतर 17 एप्रिल रोजी पंढरपूरच्या पोट निवडणुकीचं मतदान पार पडलं. एक एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान महाविकासआघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी पंढरपूर मंगळवेढ्यात प्रचार सभांचा धडाका लावला. दोनशे लोकांच्या सभांचे मंजुरी असताना हजारोंचा सहभाग दिसत होता. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

पंढरपूर मंगळवेढा मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला. पंढरपुरात मार्च महिन्यामध्ये 855 रुग्ण आढळून आले होते आता 22 एप्रिल पर्यंत 3 हजार 228 पूर्ण बाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवेढ्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून मंगळवेढ्यात मार्च महिन्यामध्ये 168 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. आता एप्रिलच्या 20 दिवसांमध्ये 1 हजार 671 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल