Pandharpur Kartiki Ekadashi 
महाराष्ट्र

Pandharpur Kartiki Ekadashi : 'या' दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा

  • श्री. रामराव बसाजी वाले‌गावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेचा मान

(Pandharpur Kartiki Ekadashi) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. मंदिराला रोषणाई करण्यात आली असून अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहे.

यावेळी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली. विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता संपन्न झाली. या पूजेचे मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील पोटा गावातील श्री. रामराव बसाजी वाले‌गावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

त्यांना राज्य सरकार तर्फे मोफत प्रवासासाठी एसटीचा पास देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रामराव वालेकर हे विठुरायाचे निःश्चिम भक्त आहेत ते गेले वीस वर्षापासून कार्तिकीची वारी करतात. दर्शन रांगेतून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. यावेळी मोहोळ तालुक्यातील पापरी व देवडे येथील मानसी माळी व समाधान थोरात या दोन विद्यार्थ्यांना महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा पहिल्यांदाच मान मिळाला आहे.

कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या सजावटी साठी पाच टन देशी-विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही मोफत सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा