महाराष्ट्र

पंढरपुरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला साजरा

Published by : Lokshahi News

नामदास व हरिदास यांच्या वंशजाकडून साजरा करण्यात येणारा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर खर्‍या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून महाव्दार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे.

पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुकाचा प्रसाद देत काला करण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार हरिदास घराण्यात अकरा पिढ्यापासून हा उत्सव साजरा केला जातो. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना येथे दिंडीचा मान आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा काल्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केवळ अकरा जणांना प्रवेश देण्यात आला. परंपरेप्रमाणे दुपारी बारा वाजता काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या.

यानंतर मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर दही हंडी फोडण्यात आली. यानंतर हा उत्सव महाव्दार घाटावरून चंद्रभागेचे वाळवंट, कुंभार घाट, माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथून काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...