थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pannalal Surana Passed Away ) ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. त्यांनी शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर लेखन देखील केलं. त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्या निधनामुळे सोलापूरसह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Summery
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन
त्यामुळे सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होत
मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली