थोडक्यात
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण
आमदार महेंद्र दळवींचा मोठा गौप्यस्फोट
"राष्ट्रवादीच्याच नेत्याने त्यांचा घात केला असं माझे म्हणणं आहे"
(Parth Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर गौप्यस्फोट केलाय.
आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, "एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतो आहे हे देखील आपण बघितलं. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे काही नवीन नाही." सुनील तटकरे यांच्यावर झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची देखील त्यांनी आठवण करून दिली. धनंजय मुंडे यांनी कुणाची सुपारी कशी दिली हे सुद्धा आपण पाहिलं , राज्यातील स्थिती गंभीर असल्याचं ते म्हणाले. "राष्ट्रवादीच्याच नेत्याने त्यांचा घात केला असं माझे म्हणणं आहे." त्यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.