(Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत 5 जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही उपाध्याय यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे. हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकवणे आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याआधीच तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.