सरकारी तेल कंपन्यांनी आज 23 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर परत वाढवले आहेत. सलग चौथ्या दिवशी ही दर वाढ झालेली आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर येउन ठेपलेला असताना ही दरवाढ होत आहे. त्यामुळे दिवाळीत महागाई वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सरासरी डिझेल 58 पैशांनी वाढून 103.15 ₹/L आहे तर पेट्रोल 35 पैशांनी वाढून 113.32₹/L आहे.
मुंबईत पेट्रोल 113.12 ₹/L रुपये आणि डिझेल 104.00 ₹/Lरुपये प्रति लिटर आहे. ४ मेट्रे सिटीज पैकी मुंबईत आजही इंधन दर सर्वाधिक आहेत.