विनोद गायकवाड(दौंड)
वाकड परिसरामध्ये चारचाकी वाहनाची तोडफोड करणाऱ्या गाव गुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे.
दोन – तीन दिवसांपूर्वी वाकड परिसरातील महतोबा नगर झोपडपट्टी समोर गाव गुंडाच्या टोळक्यानी पंधरा माल वाहक ऑटो रिक्षाची तोडफोड केली होती.
त्यामुळे वाकड परिसरातील नागरिकांत मोठं दहशतीच वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गाव गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ही धिंड काढली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परीसरात दहशत बसवण्यासाठी टोळक्याकडून वारंवार वाहने तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी आता या गुन्हेगारांची धिंड काढल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केल जात आहे.