BJP GETS FIRST-EVER MAJORITY, MAHAYUTI VICTORY SHAKES POLITICS 
महाराष्ट्र

PM Narendra Modi: 'मुंबई महापालिकेत भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळालं, भाजप आता लोकप्रिय होतेय', पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

MahaYuti Victory: मुंबई महापालिकेत भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणकट विजय मिळवला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे पूर्ण ताकद लावून ही लढत जिंकली. दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर झालेल्या ऐतिहासिक युतीला अपयश आले असले तरी निवडणुकीने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले असून, महापौरपदाच्या निवडीवर सस्पेन्स वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा येथील सभेत मुंबईच्या निकालावर थेट भाष्य केले.

काँग्रेसवर सडकून टीका करताना त्यांनी म्हटले की, भाजपा हा देशभरात लोकांचा आवडता पक्ष बनला असून, गेल्या दीड वर्षांत लोकांचा विश्वास वाढत आहे. बिहारसह इतर ठिकाणी मिळालेल्या यशानंतर मुंबईतही पहिल्यांदाच भाजपाला ऐतिहासिक मतदान झाले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांत भाजपाला सेवेची संधी मिळाली आहे.

मोदींच्या या विधानांमुळे भाजपा आणि शिवसेनेच्या महापौरपदाच्या चर्चेला नवे वळण मिळाले असून, शीर्षस्थ नेत्यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. काझीरंगामध्ये मुंबईचा उल्लेख करून मोदींनी महायुतीच्या विजयाचा सोहळा साजरा केला असल्याने आता महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, पुढील घडामोडीांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला.

  • भाजपला मुंबईत पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं.

  • काझीरंगा सभेत पंतप्रधान मोदींनी मुंबई निकालावर भाष्य केलं.

  • महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा