Navi Mumbai Airport Inauguration 
महाराष्ट्र

Navi Mumbai Airport Inauguration : PM Narendra Modi : 'या' तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक डिसेंबरपासून सुरू होणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

  • उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा

  • विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक डिसेंबरपासून सुरू होणार

(Navi Mumbai Airport Inauguration ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर विमानतळ परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविला जाणार आहे.

विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. जल वाहतुकीद्वारे जोडले जाणारे हे देशातील पहिले विमानतळ ठरणार असून राष्ट्रीय महामार्ग , मुख्य शहरी रस्ते, उपनगरीय रेल्वे, मेट्रो व जल वाहतुकीद्वारे हे विमानतळ जोडले जाणार आहे.

उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर ते प्रथम टर्मिनलची पाहणी करतील. या विमानतळामुळे आता मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा असून हवाई वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा