महाराष्ट्र

Atharva Sudame : 50 हजार भरा, नाहीतर कारवाई’ PMPMLने अथर्व सुदामेला नोटीस बजावली

Atharva Sudame : सोशल मीडियावर ओळख निर्माण केलेला अथर्व सुदामे सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी PMPML बसमध्ये शूट केलेल्या व्हिडिओमुळे त्याच्यावर कारवाई झाली.

Published by : Riddhi Vanne

Atharva Sudame :सोशल मीडियावर ओळख निर्माण केलेला अथर्व सुदामे सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी PMPML बसमध्ये शूट केलेल्या व्हिडिओमुळे त्याच्यावर कारवाई झाली असून आता त्याला थेट 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अथर्वने बसमध्ये विनोदी आशयाची रील तयार केली होती. प्रवासी आणि कंडक्टरमधील हलक्या-फुलक्या संवादावर आधारित हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र परवानगी न घेता सार्वजनिक वाहतुकीत शूटिंग केल्याने PMPML ने त्याची दखल घेतली.

या निर्णयामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण PMPML च्या भूमिकेला योग्य ठरवत आहेत, तर अनेक चाहते ही कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हणत संताप व्यक्त करत आहेत. “इतर जणही बसमध्ये रील करतात, मग कारवाई फक्त अथर्ववरच का?” असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा PMPML कडून देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा