Raigad  Team Lokshahi
महाराष्ट्र

खोपोलीत फायटर कोंबड्यांवर सट्टा लावण्याचा प्रकार उघडकीस, पोलीसांनी केली ३२ जणांनावर कारवाई

फायटर कोंबड्यावर सट्टा लावण्याचा प्रकार आला समोर

Published by : Sagar Pradhan

रायगड: खोपोलीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमध्ये कोंबड्यांची झुंज लावल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे फायटर कोंबड्यावर हा सट्टा लावण्यात येत होता. हा सर्व प्रकार खोपोलीतल्या तेजस फार्म हाऊसवर घडला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फार्म हाऊसवर कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसांनी घटनास्थळी ४० कोंबड्या घेतल्या ताब्यात घेतल्या आणि सोबतच फायटर कोंबड्यावर सट्टा लावणाऱ्या ३२ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. खालापूर DYSP संजय शुक्ला आणि खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी ही कारवाई केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी