महाराष्ट्र

Sindhudurg Crime : वैभववाडीत पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या; कारणही आले समोर

वैभववाडी: पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या; मानसिक तणावामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ.

Published by : Team Lokshahi

वैभववाडी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे (वय ४०, मूळ गाव कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. गुरुवारी (ता. १ मे) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

कॉन्स्टेबलने अनिल शेटे यांची काही काळासाठी विजयदुर्ग पोलिस स्थानकात बदली झाली होती. त्यानंतर ते पुन्हा वैभववाडी येथे परत आले. सध्या ते आपल्या कुटुंबासह एका गृहसंकुलात वास्तव्यास होते. काही काळापासून ते मानसिक तणावाखाली असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते कोल्हापूरहून उपचार घेऊन परतले होते.

घटनेच्या दिवशी सायंकाळी त्यांची पत्नी स्वयंपाकात व्यस्त असताना अनिल शेटे बेडरूममध्ये गेले. बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्यामुळे पत्नीने खिडकीतून पाहिले असता, त्यांनी पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. तात्काळ आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांनी तातडीने दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवले. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा