थोडक्यात
मंत्री कोकाटे बदनामी प्रकरणी पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर
कृषीमंत्री असतांना माणिकराव कोकाटे यांचा आमदार रोहित पवारांनी केला होता रम्मी खेळतांनाचा व्हिडीओ शेअर
कोकाटे यांनी रोहित पवारांनी माफी मागावी यासाठी बजावली होती नोटीस
(Manikrao Kokate ) मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. कृषीमंत्री असतांना माणिकराव कोकाटे यांचा आमदार रोहित पवारांनी रम्मी खेळतांनाचा व्हिडीओ शेअर केला होता. कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात रोहित पवारांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
रोहित पवारांनी माफी मागावी यासाठी कोकाटे यांनी नोटीस बजावली होती. नाशिकच्या न्यायालयाने नाशिक पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज नाशिक पोलिसांनी अहवाल सादर केला असून न्यायालय यावर काय आदेश देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.