थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Prakash Mahajan) ठाकरे बंधूंची काल संयुक्त सभा पार पडली. या सभेमधून ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. या सभेवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे की, "काल अदानी पुराण सुरू केलं. मला सांगा राज ठाकरे साहेब आपल्या मातोश्रीत बिल्डर्सची प्रगती कधी झाली. युतीची सत्ता होती तेव्हा तुमची मातोश्री वाढली. त्यावेळेस तुम्ही कोहीनूर मील घेतली."
"या दोन भावांनी किती मराठी माणसं, किती मराठी उद्योगपती मुंबईत आणलं. अंबानीच्या लग्नात तुम्ही नाचता, अदानीला तुम्ही जेवायला बोलवता. मराठी माणसाचे राज ठाकरे एकटं प्रतिनिधी नाही आहेत. जनतेने तुम्हाला नाशिकची सत्ता दिली काय केलं?" असे प्रकाश महाजन म्हणाले.
Summary
प्रकाश महाजन यांनी मुंबईतील ठाकरे बंधूंच्या प्रचार सभेवर टीका केलीये
कालची सभा ही कौटुंबिक नाट्य होतं-प्रकाश महाजन
ठाकरेंनी पुन्हा अदानी पुराण सुरू केलं-महाजन