बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Prashant Jagtap) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध होता.
ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल त्यावेळी मी राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. यातच प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली होती.
याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज प्रशांत जगताप मुंबईत काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आजच प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
मुंबईत आज काँग्रेस नेत्यांची भेट घेणार
आजच पक्षप्रवेशाची शक्यता