बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar- Ajit Pawar ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आता पुणे आणि पिंपरी – चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीला सुरूवात झाली असून काल रात्री अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे यांच्यात गुप्त बैठक झाली.
एकत्र निवडणूक लढवायची असेल तर जागा वाटपाचे अंतिम निर्णय घ्यावे लागणार, बैठकीत तिघांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीला सुरूवात झाली असून शरद पवार आणि अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summary
15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार
पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीला सुरूवात
शरद पवार-अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष