महाराष्ट्र

नाथषष्ठी सोहळ्याची जय्यत तयारी; पोलिसांनी जड वाहतुकीच्या मार्गात केला बदल

पैठण येथिल संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पायी दिंडीने पैठण येथे येत आहे

Published by : shweta walge

सुरेश वायभट /पैठण: पैठण येथिल संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पायी दिंडीने पैठण येथे येत असल्याने पोलिस प्रशासनाने पैठण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीच्या मार्गात ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीसाठी बदल केला आसल्याची माहिती पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे.

असा केला वहातुकीत बदल

शहागड-आपेगाव मार्गे पैठणकडे येणाऱ्या वाहनांनी शहागड- पार्चाड-छत्रपती संभाजीनगर मार्गे जावे. तर पाचोड-पैठण बिडकीन- इसारवाडी फाटा-अहमदनगर हायवे ऐवजी पाचोड- चित्तेगाव- छत्रपती संभाजीनगर असे वाहनधारकांनी जावे.

सोलापूर धुळे एनएच ४२ महामार्ग कचनेर फाटा- कचनेंर-पोरगाव चौफुली बिडकीन-शेकटा ईसारवाडी फाटा-छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हायवे मार्गे अहमदनगरकडे जाण्याऐवजी सोलापूर-धुळे एनएच ५२ महामार्ग बीड मार्गे येणारी जड वाहतूक ही एनएच ५२ महामार्ग ते सरळ पुढे ए. एस. क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हायवेने अहमदनगरकडे जाईल. याप्रमाणे व उलट दिशेने वाहने ये-जा करतील, असं पैठण शहराचे पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा

Pune : पुण्यात मुसळधार पाऊस; थेऊरमधील 50 घरामध्ये शिरलं पाणी

Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल पुन्हा ठप्प; महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड