महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर

Published by : Lokshahi News

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत. पाच हजार १९० कोटी रुपयांच्या विकास कामांचे ते उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान सकाळी १०.१५ वाजता सिद्धार्थनगरला पोहोचतील. तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते वाराणसीला जाणार आहेत.

देशातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी पंतप्रधान ६५ हजार कोटी रुपयांची स्वावलंबी स्वस्थ भारत योजनाही सुरू करणार आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या एक दिवसाच्या दौऱ्यात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.

नव्याने बांधलेल्या रिंग रोड फेज २ च्या जवळ असलेल्या मैदानावर सभेत ते संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता वाराणसीला पोहोचतील आणि २.३० वाजता बाबतपूर विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली