PM Narendra Modi  
महाराष्ट्र

PM Narendra Modi : नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट, म्हणाले...

राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(PM Narendra Modi ) राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि महायुतीला चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला असून भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे.

'आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो.' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Summary

  • राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकींचा निकाल जाहीर

  • नगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट

  • 'महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा