महाराष्ट्र

नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेड मधून अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे दहशतवाद्याचे नाव असून तो खलिस्तान झिंदाबाद या संघटनेचा सदस्य आहे. त्यांनी हिंदूत्ववादी नेत्यांच्या हत्येचा त्याने कट रचला होता. नांदेड पोलिस आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे. विमानाने त्याला मंगळवारी सकाळी अमृतसर येथे पाठविण्यात आले आहे.

सरबजीतसिंघ पंजाबमधील लुधियानाचा रहिवाशी आहे. खलिस्तान समर्थक इतर चार दहशतवादी यांच्यासह त्याने विदेशातुन निधी गोळा करणे, शस्त्र जमविणे यामध्ये तो सक्रिय होता. तसेच खलिस्तान चळवळीला विरोध करणाऱ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट त्यांनी रचला होता. या प्रकरणात अमृतसर येथे गुन्हा नोंदवला होता. या संघटनेला बेल्जियम येथून पैसा पुरवला जातो असे उघडकीस आले आहे. पंजाब सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री आरोपीस अटक केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?