बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीला एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते.
या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांनी सांगितले. पुणे आणि बारामतीप्रमाणे नाशिकमध्ये पण एकत्र लढा असे अजित दादा यांच्या स्थानिक नेत्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना निरोप देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.