Pune CNG Price Hike Team Lokshahi
महाराष्ट्र

Pune CNG Price Hike: ऐन सणासुदीला पुण्यात सीएनजी महागला...

मागच्या तीन महिन्यात सीएनजीच्या दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे.

Published by : Vikrant Shinde

अमोल धर्माधिकारी | पुणे: नवरात्र सुरू असतानाच पुणेकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पुण्यामध्ये सीएनजीच्या किंमतीत तब्बल 4 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात सीएनजीचा दर 87 वरून 91 रुपये झालाय. याचा सीएनजी वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे. मागच्या तीन महिन्यांचा विचार करता पुण्यात सीएनजी एकूण 6 रुपयांनी महागलाय.

सीएनजी दरवाढीमुळे सर्व गोष्टी महागणार:

जवळपास सर्वच व्यवसायांसाठी दळण-वळणाची साधनं गरजेची असतात. आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं प्रवासासह दळणवळणही महागणार आहे. त्यामुळे, प्रत्येक वस्तू व सेवा महागण्याची शक्यता आहे. परिणामी पुणेकरांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड