महाराष्ट्र

पुणे | लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आवळला गळा, प्रियकराचा मृत्यू

Published by : Lokshahi News

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकाराची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडलीय. पैगंबर गुलाब मुजावर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुजावरचे त्याच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या 29 वर्षीय महिलेशी संबंध होते.

महिला मुजवरला लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र लग्न झालेले असल्याने मुजावर लग्नाला नकार देत होता. या महिलेने त्याला रविवारी पिंपरी मधील व्हाइट हाऊस या लॉज वर बोलवले. तिथं त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. मुजावने प्रचंड मद्यप्राशन केले होते. त्यातच महिलेने मुजावरचा गळा ओढणीने आवळून त्याची हत्या केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा