महाराष्ट्र

Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं, चार प्रवासी जखमी

पुणे जिल्ह्यात सकाळ पासून पावसाचा जोर सुरू आहे. यातच एक मोठी दुर्घटना घडली आहे.

Published by : shweta walge

पुणे जिल्ह्यातील पौडजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल आहे. या दुर्घटनेतल २ जण गंभीर जखमी आहेत. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी होते, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त हाती आलं आहे. स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेत मदत केली आहे.

हे हेलीकॉप्टर एका खासगी विमान कंपनीच असून मुंबईहून हैदराबादला हे हेलिकॉप्टर चाललेलं. हेलीकॉप्टरमध्ये 4 लोग होते. पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना ही घटना घडली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची एसपींनी माहिती दिली. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर होतं. मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॅाप्टर चाललं होतं. पायलट आणि तीन प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलीकॉप्टर दुर्घटनेत प्रवासी जखमी झाले आहेत. हेलीकॉप्टरमध्ये असलेल्या चौघांपैकी कॅप्टन जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तिघांची प्रकृती स्थिर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा