Pune Kidney racket  team lokshahi
महाराष्ट्र

Pune Kidney Racket : रूबी हॉस्पिटलच्या मालकासह 15 डॉक्टरांविरोधात गु्न्हा दाखल

LOKशाहीनं वारंवार पाठपुरवा केल्यानंतर अखेर 'रूबी'वर गुन्हा दाखल

Published by : Shweta Chavan-Zagade

पुण्यातील बहुचर्चित रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणी (Pune kidney racket) अखेर रूबी हॉस्पिटलच्या (Ruby Hall Clinic) मालकासह 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत LOKशाही न्यूजने वारंवार पाठपुरवा केल्यानंतर अखेर 'रूबी'वर गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे अमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र त्यानंतर आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलीसांत तक्रार दाखल केली. तसेच रुग्णाशी पत्नीचे नाते आहे असे सांगून हे अवयवप्रत्यारोपण करण्यात आले होते. या विषयावर गदारोळ झाल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्‍लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर चौकशीसाठी जे. जे. मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसह 'रुबी हॉल' मधील तज्ज्ञांना चौकशीसाठी मुंबईला बोलावण्यात आले.

'ससून'ची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रत्यारोपण समिती स्थगित ठेवण्याचा आदेश दिले होते. हे प्रकरण अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना चांगलेच भोवले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. तावरे यांनी पदभार सोडला. अखेर ण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणी लोकशाही न्यूजने पर्दाफाश केल्यानंतर रूबी हॉस्पिटलच्या मालकासह 15 डॉक्टरांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द