पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला पुणे लिट फेस्ट फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावरील सभामंडपात आजपासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लेखन, इतिहास, संशोधन, समाज, प्रशासन, माध्यमे, तंत्रज्ञान, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा अशा विविध विषयांवर देश-विदेशातील नामवंत वक्त्यांची सत्रे होणार आहेत.