महाराष्ट्र

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! दिराने वहिनी दोन मुलांना पेट्रोल टाकून जाळले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले आहे. पुण्यातील कोंढव्याजवळ असलेल्या पिसोळी येथे ही घटना उघडकीस आली आहे. नात्याने वहिनी असलेल्या महिलेला तिच्या दोन चिमुरड्यासह दीराने पेट्रोल टाकून जाळले आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

वैभव वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. आम्रपाली वाघमारे असे महिलेचे नाव असून रोशनी (वय 6) व आदित्य (वय 4) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत.

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेले वैभव वाघमारे आणि आम्रपाली वाघमारे हे दोघे प्रेमप्रकरणातून काही महिन्यापूर्वी गावावरुन पळून पुण्याला आले होते. पिसोळी जवळील एका सोसायटीत आम्रपाली धुणीभांड्याचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये ते दोघेही राहू लागले. वैभव सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करून रात्रपाळीला वॉचमनची नोकरी करत होता. दरम्यान, आम्रपालीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वैभवला आला होता. याच कारणावारुन आम्रपाली आणि वैभवमध्ये वाद झाला असता रागाच्या भरात आरोपीने पेट्रोल टाकून आम्रपाली आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी