महाराष्ट्र

‘लसीकरण आपल्या दारी’; एक अभिनव उपक्रम

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी | पुणे शहरात 108 टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नाही, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

वंचित समाज पोतराज, गोधडी शिवण्याचा व्यवसाय करणारे, नंदिवाला या समाजात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा होती. लस घेण्यासाठी हा समाज तयार होत न्हवता. काही लोकांमध्ये जागृती नव्हती, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील प्रगती फाउंडेशनकडून लस परिसर १०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने या समाजाची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या भागात घरोघरी जाऊन लस देण्यात आली आहे. वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक असे लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. अनेकांमध्ये लसीकरण विषयी जागृती नाही. अशा लोकांसाठी हा उपक्रम असून कात्रजमधील प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम 8 ऑक्टोबर पासून कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येत आहे. प्रतिक कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत