थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.
मुंबई अधिवेशनात झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असून हा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार आहे. विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार असून सर्जेराव टकले व नितीन देशमुख या दोघांमध्ये हा राडा झाला होता. सर्जेराव टकले व नितीन देशमुख या दोघांना एक दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summery
मुंबई विधानभवन राड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार
आव्हाड- पडळकर समर्थक राडा प्रकरण
दोन्ही कार्यकर्त्यांना एक दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता