राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील चार दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे.
यामुळे पाटबंधारे विभागाने तत्काळ क्रमांक 3,4,5 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडले. यातून ५, ७०९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणातून एकूण ६,९१२ क्यूसेक वसर्ग सुरू आहे.