महाराष्ट्र

गौतमी तुझ्या इच्छा-अटी सर्वमान्य, बोल तू होते का माझी परी! बीडच्या तरुणाचे गौतमीला पत्र

बीडच्या 26 वर्षीय तरुणाचे गौतमीला पत्र, लग्न करायला तयार असशील तर येऊन भेट म्हणून दिला घरचा पत्ता

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास माने | बीड : आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेत पुन्हा भर पडलीय. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटीलची. या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातली आहे. गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्वमान्य. बोल तू होती का माझी परी, असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने म्हटलं आहे.

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलं की, गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी पण तू होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे.

पत्र लिहिण्याचे कारण की मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.

तरी तुझ्या वरील सर्व इच्छा-अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु. पो. चिंचोली माळी तालुका केज, जिल्हा बीड या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे, असे रोहनने या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, वराच्या शोधत असणाऱ्या गौतमी पाटील बीडच्या या रोहन गलांडे पाटीलाला भेटायला जाणार का? आणि त्याच्यासोबत लग्न करणार का? हेचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, सध्या या पत्राची जोरदार चर्चा होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?