थोडक्यात
राहुल गांधींना आज पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.
सात्यकी सावरकरांकडून दाखल करण्यात आला होता मानहानीचा खटला
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.
लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गांधी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. यापूर्वी गांधी यांना विशेष न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले. त्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.