लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाविषयी देखील मोदी यांनी भाष्य केले. शेतकरी आंदोलनात काही आंदोलनजीवी प्रवृत्ती घुसल्या आहेत, असे मोदी म्हणाले. त्यावरून मोदी यांच्यावर टीका होत आहे. तसेच आंदोलनजीवी शब्द ट्रोल होत असून राजकीय नेत्यांनीही यामध्ये उडी घेतली आहे.
शिवसेना तसेच काँग्रेसनेही याला प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी क्रोनीजीवी असं म्हटलंय. याचा अर्थ मैत्रीजीवी असा होतो. तसेच तो देश विकायला निघालाय. असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने अनेक सरकारी बँक तसेच काही कंपन्यांमध्ये खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राहुल गांधींनी निशाणा साधलाय. मोदी त्यांच्या मित्रांना देश विकत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
बाबा रामदेव, किरण बेदी, आण्णा हजारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल मोदी असं बोलले हे निर्दयी वाटत नाही का, असा खोचक टोला माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी लगावलाय. संसदेत मोदींनी आंदोलनजीवी शद्ब वापरला. मात्र तो विष्ठूर नाही का, असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केलाय.