महाराष्ट्र

आमदार अपात्रतेचा निकाल देण्यापूर्वी राहुल नार्वेकर म्हणाले...

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज फैसला होणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगितले जात आहे. १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, निकाल कायद्याला धरुन असणार. निर्णयातून सर्वांना न्याय मिळेल. आज कायद्याला धरुन निकाल दिला जाईल. निर्णयात कुठल्याही त्रुटी राहणार नाही. निकाल देताना कायद्याचे पालन केलं जाणार. संविधानाच्या चौकटीत निकाल दिला जाणार. बेंचमार्क ठरणार निकाल असेल. योग्य तोच निर्णय दिला जाणार.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल