थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sangola) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात धाडसत्र पाहायला मिळते आहे. सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भाजप, शेकाप, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयातही तपासणी करण्यात आली. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवरही रात्री छापेमारी करण्यात आली. या धाडसत्रामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Summery
नगरपालिका निवडणूक काळात सांगोल्यात धाडसत्र
सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी
भाजप, शेकाप, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर धाडी