महाराष्ट्र

Maharashtra Budget 2022 | रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटी

Published by : left

महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.आता या अर्थसंकल्पातून राज्यातल्या सामान्य माणसाला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटीचा निधी देण्यात येणार आहे.राजगड तोरणा, शिवेनेरी, सजगड, विजय दुर्गसाठी 14 कोटी देण्यात येणार आहे. शिवडी आणि सेंटजॉर्जच्या विकासासाठी 7 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी, मुख्यमंत्री ग्रामीण पेय जल मिशन साठी पाणीपुरवठा विभागाल 3 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कोयना धरण परिसरात दर्जेदार जलपर्यटन प्रकल्प उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हेरिटेज वॉक उभारणार आहे. पालघरला पर्यटन स्थळाचा ब वर्ग दर्जा देण्यात येणार आहे.  
अजिंठा वेरुळसाठी सर्वांगीण विकास आराखडा, आधुनिक सामुहिक सुविधा केंद्र, लोणावळा टायगर पॉईंट येथे स्कायवॉक आणि इतर सुविधा उभारणार. 

महत्वाचे मुद्दे 

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव उपक्रम सुरु त्यासाठी 500 कोटी
गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी फिल्म
औरंगाबाद येथे वंदे मातरम सभागृह उभारणार 43 कोटी
सांस्कृतिक विभागासाठी 195 कोटी
पोषणतत्वे गुणसंवर्धित तांदूळ उपलब्ध करुन देण्यासाठी योजना राबवण्यात येणार
प्रजासत्ताक दिनाला दिलेल्या महाराष्ट्राच्या एनसीसीच्या पथकानं पटकावला, पृथ्वी पाटील यांचं अभिनंदन
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलिस दलात सहभाग
अमंलदारांच्या मासिक कमांडो भत्ता वाढवण्यात येणार

गडचिरोलीत विशेषोपचार केंद्र
महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार
अष्टविनायक मंदीर सर्वांगीण विकास आरखडा 50 कोटी
पंढरपूरच्या विकास आरखड्यासाठी निधी देण्यात येणार
सारथीला 250 कोटी
वनक्षेत्रात 20 चौरस किलोमीटरची वाढ
चंद्रपूरमध्ये व्याघ्र सफारी सुरु करण्यात येणार
महाराष्ट्र जलकोष प्रकल्पाला 286 कोटी रुपये
चिंतामणराव देशमुख यांच्या स्मरणार्थ रोहा येथे वन व वनव्यवस्थापन उद्यान

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज