(Shivrajyabhishek Sohala 2025 ) किल्ले रायगडावर आज (सोमवारी) तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर येत असतात. या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत , आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
सकाळी ध्वजारोहणाने या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर शिव पालखी वाजत गाजत येईल. त्यानंतर राज सदरेवर राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. जलाभिषेक, दुग्धाभिषेक होईल. मेघडंबरीतील सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाईल. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येईल.
राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वदिनी शिरकाई देवीच्या पूजनापासून या सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. मेघडंबरी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.