महाराष्ट्र

फेसबुक, व्‍हॉटसअॅप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या..

Published by : Lokshahi News

भारत गोरेरावकर
"समाजाला तारून नेण्‍याचे सामर्थ्‍य तरूणाईत आहे. परंतु आजची तरूणाई भरकटेलली दिसते आहे. फेसबुक आणि व्‍हॉटसअप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा आपल्‍या देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या" असा संदेश नुकतेच आयएएस झालेले प्रतिक जुईकर यांनी तरूणाईला दिला आहे.

रायगड जिल्‍हयातील पहिले आयएएस होण्‍याचा मान जुईकर यांनी नुकताच मिळवलाय.  अलिबाग तालुक्‍यातील चौकीचा पाडा वालवडे या त्‍यांच्‍या मूळ गावातील ग्रामस्‍थांच्‍या वतीने आमदार जयंत पाटील यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला, या कार्यक्रमातले त्यांचे हे तरूणाईला प्रोत्साहित करणाच्या दृष्टीने केलेलं हे विधान नक्कीच विचारात घेण्यासारखे आहे. सत्‍कार समारंभात परीसरातील नागरीक, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. प्रतिक यांना घडवणारे त्यांचे आईवडील, आजी आजोबा यांनाही सन्मानित करण्यात आले. 

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम