महाराष्ट्र

Rain Updates: हवामान विभागाचा इशारा; पुढील 7 दिवस 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अर्लट

मुंबईत रविवारी, सोमवारी, तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईत रविवारी, सोमवारी, तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, तसेच उपनगरांत असह्य उकाडा जाणवत आहे. तसेच शहरात रात्रीही प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. दरम्यान, सध्या विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअसदरम्यान असेल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी 33.8 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पावसाचा इशारा असलेले जिल्हे धुळे, नाशिक, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली , धाराशिव हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. 12 मे रोजी देखील कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकड्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर मध्ये 32 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान राहणार असून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा