थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
यातच आता मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली असून मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे.
जागावाटप आणि प्रचार दौऱ्यांबाबत या बैठकीत चर्चा होणार असून राज ठाकरेंच्या सभा दौरे, निवडणूक रणनीतीवरसुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज, उद्या एबी फॉर्म देण्यात येणार असून एकाच दिवशी फॉर्म भरण्याचे आदेश राज ठाकरे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summery
राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
जागावाटप आणि प्रचार दौऱ्यांबाबत होणार चर्चा